|Sunday, August 18, 2019
You are here: Home » leadingnews » एसटी महामंडळ आणि संघटनांची बैठक निष्फळ

एसटी महामंडळ आणि संघटनांची बैठक निष्फळ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

एसटी महामंडळाचे व्यवस्थापक आणि कर्मचारी संघटनांमधली बैठक निष्फळ, बैठकीत संपाबाबात कुठलाही तोडगा नाही, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि दिवाकर रावते यांच्यात बैठक होणार असल्याचे समजत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 8 तारखेच्या मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केले आहे. हे कामबंद आंदोलन अद्यापही सुरुच आहे. राज्यातील अनेक ठिकाणच्या बस डेपोमधून गाड्याच बाहेर निघाल्या नाहीत.

 पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे. अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. अचानक काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्यभरात शेकडो कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. एकट्या बीड जिल्ह्यात 121 जणांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. तर यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 9 आगारातील 46 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक आगारातील काही जणांचं निलंबन मागेही घेण्यात आले आहे. पण मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित झालोत तरी संप सुरुच ठेऊ, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, शिवशाही बस आणि शिवसेना प्रणित वाहतूक संघटनेकडून मात्र वाहतूक सुरु आहे.