|Sunday, January 26, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘सलमान सोसायटी’मध्ये बालकलाकारांची टोळी

‘सलमान सोसायटी’मध्ये बालकलाकारांची टोळी 

   कैलाश पवार दिग्दर्शित आणि लिखित मराठी चित्रपट ‘सलमान सोसायटी’चा मुहूर्त प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर 3 दिवसांचे पहिले शेडय़ुल पार पडले आणि पवार यांनी दुसऱया शेडय़ुलमध्ये अंतर ठेवले. या अंतराचे कारण म्हणजे, ‘सलमान सोसायटी’साठी बालकलाकारांना तयार करणे. त्यासाठी कित्येक वर्कशॉप घेण्यात आले आणि चित्रपटातील सगळय़ाच कलाकारांनी सहभाग घेतला.

  ‘सलमान सोसायटी’ या चित्रपटात ‘बाळकडू’ आणि काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘गावठी’ चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारे गौरव मोरे आगामी चित्रपट ‘सलमान सोसायटी’मध्ये एका वेगळय़ा पण महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात पुष्कर लोणकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही प्रसिद्ध बच्चेकंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. बालकलाकार पुष्कर लोणकरने या आधी एलिझाबेथ एकादशी, बाजी, रांजण, चि व चि. सौ. कां, फिरकी आणि टी.टी.एम.एम चित्रपटात अभिनय केलाय. तर शुभम मोरे याने हिंदी चित्रपट ‘रईस’मध्ये बालपणच्या शाहरुख खानची भूमिका वटवली. तसेच हाफ टिकीट, फास्टर फेणेसारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत. तर बालकलाकार विनायक पोतदार याने हाफ टिकीट, ताजमहल आणि येरे येरे पावसामध्ये भूमिका केल्या आहेत.

  सलमान सोसायटीचे एकूण 3 शेडय़ूल होणार असून चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, नवी मुंबईच्या जवळील भागात होईल. तसेच चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

Related posts: