|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » शरद पवार यांनी देशाचे राजकारण करावे,द्वेशाचे नाही-मुख्यमंत्री

शरद पवार यांनी देशाचे राजकारण करावे,द्वेशाचे नाही-मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शरद पवार यांनी देशाचे राजकारण करावे, नाही की द्वेशाचे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पवारांनी काल पुण्यातील मेळाव्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना आलेल्या धमक्या केवळ सहानुभूतीसाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशय व्यक्त केला.

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे ट्विट केले की,’ ‘मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी! पंतप्रधान हे पक्षाचे नाही, तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही!’. दरम्यान पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत, सत्य काय ते बाहेर येईलच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारचं विधान करुन त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला तिसऱया आघाडीमध्ये सामील होण्याचं आमंत्रणच दिलं आहे. आज रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या 19 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पालघरमध्ये विजय झाल्याचा भाजपचा दावा किती पोकळ आहे हे सांगताना पवारांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. नोटाबंदी, सरकारची चार वर्षे, ईव्हीएम बिघाड, महाराष्ट्र सदन अशा अनेक मुद्यांवरून पवारांनी सरकारला लक्ष्य केले आहे. पुण्यातल्या शिंदे विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून हजारो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आलेल्या धमक्मया या केवळ सहानुभूतीसाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशयही पवारांनी व्यक्त केला आहे.

Related posts: