|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चव्हाणवाडी येथे नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू

चव्हाणवाडी येथे नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू 

वार्ताहर/ कोलोली

चव्हाणवाडी (ता. पन्हाळा) येथील शेतकरी गणपती भाऊ खाडे (वय 64) हे मनकर्णिका नदीत बुडाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालय कोल्हापूर नेले असताना असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गणपती खाडे नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आपली जनावरे घेवून गावाशेजारी गेले होते. जनावरे धुताना त्यांना पाण्याचा अंदाज लागला नाही. ते खोल खड्डय़ात पडले. ही घटना बाजूला शेतात काम करीत असलेल्यांनी पहाताच त्यांनी नदीकडे धाव घेतली व गणपती खाडे यांना पाण्याबाहेर काढले. उपचारासाठी सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर येथे नेण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे.

सीपीआरमध्ये उत्तरणीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा चव्हाणवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि. 11 रोजी सकाळी 10 वाजता चव्हाणवाडी येथे आहे.

Related posts: