|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अटल टिंकरिंग लॅब’मुळे विज्ञान-तंत्रज्ञानाचे नवे दालन

अटल टिंकरिंग लॅब’मुळे विज्ञान-तंत्रज्ञानाचे नवे दालन 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शाहूपुरीतील वि.स.खांडेकर प्रशालेमधील ‘अटल टिंकरिंग लॅब’मुळे विज्ञान-तंत्रज्ञानाचे नवे दालन उपलब्ध झाले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. प्रशालेतील या लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत  झाले. याप्रसंगी  ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगांवकर तर शिक्षण संचालक (पुणे) दिनकर पाटील व इस्त्रो वैज्ञानिक बी.एच.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 मंत्री पाटील यांच्याहस्ते लॅबचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या निती आयोगाने मंजूर केलेले ‘अटल टिंकरिंग लॅब’ वि.स.खांडेकर प्रशालेत सुरू केली आहे. मुलांच्यात वैज्ञानिक दृष्टी रूजावी, त्यांना नवनविन वैज्ञानिक प्रयोग करता यावेत यासाठी विद्यार्थ्यांना लॅबचा उपयोग होणार आहे. यामुळे शिक्षक, विद्यार्थ्यांना ज्ञानाचे नवे भांडार उपलब्ध झाले असून त्याचा योग्य वापर व्हावा, असे पाटील यांनी सांगितले. मंत्री.पाटील पुढे म्हणाले, आंतरभारती शिक्षण मंडळाने नेहमीच शिक्षणक्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. सध्याच्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेण्यासाठी या रोबोटिक लॅबचा खूपच उपयोग होईल. केंद्र व राज्य शासन नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी सक्रीय असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

 यानंतर शिक्षण संचालक दिनकर पाटील व इस्त्रोचे वैज्ञानिक बी.एच.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी आंतरभारतीच्या कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगांवकर यांची स्पेनमधील मलागा येथे होणाऱया जागतिक उद्योजक परिषदेसाठी निवड झाल्याबद्दल मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात गीत मंचने सादर केलेल्या स्वागत गीताने झाली.लॅबविषयी माहिती भरत अलगौडर यांनी दिली. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सचिव एम.एस.पाटोळे, पाहुण्यांचा परिचय सहसचिव वंदना काशिद तर सूत्रसंचालन नेहा कानकेकर यांनी केले. आभार विनय पाटगांवकर यांनी मानले. .