|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ट्रम्प-किम भेटीचा भारताला लाभ!

ट्रम्प-किम भेटीचा भारताला लाभ! 

चीनचा उत्तर कोरियावरील प्रभाव ओसरणार : अवैध आण्विक तंत्रज्ञान हस्तांतरणाचा पर्दाफाश शक्य

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 

 सिंगापूरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन यांच्यातील चर्चेचे भारताने स्वागत पेले आहे. चर्चेतील आश्वासने लागू करण्यात आल्यास उत्तर कोरियात स्थायी शांततेचा मार्ग मोकळा होईल, असे भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. दोन्ही नेत्यांची भेट ‘अत्यंत सकारात्मक पुढाकार’ असल्याचे भारताने नमूद केले आहे.  कोरियन उपखंडाचा मुद्दा लक्षात घेतला जाईल आणि भारताभोवती हो असलेल्या विस्ताराच्या प्रयत्नांबद्दल आमच्या चिंता विचारात घेतल्या जातील अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया विदेश मंत्रालयाने व्यक्त केली.

भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश तर उत्तर कोरिया जागतिक स्तरावर एकाकी पडलेला देश. ट्रम्प-किम चर्चेच्या काही आठवडय़ांपूर्वी केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांच्या माध्यमातून भारताने प्योंगयांगशी संपर्क साधला होता. 1998 नंतर ही पहिली उच्चस्तरीय भेट होती. विदेश मंत्रालयाने सिंग यांच्या दौऱयानंतर उत्तर कोरियाला ‘मैत्रीपूर्ण देश’ म्हटले होते.

पाकिस्तानचे गुन्हे उघड होणार

अणू तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी भारताने पाकिस्तानला दोषी ठरविले होते. आण्विक निशस्त्राrकरण उत्तर कोरिया, चीन आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या अवैध तंत्रज्ञान हस्तांतरणाचा पर्दाफाश करेल, अशी अपेक्षा भारत बाळगून आहे. क्षेपणास्त्र स्पर्धेसाठी पाकिस्तानला सज्ज करण्यास चीनचा हात राहिल्याचे पुरावे यातून मिळू शकतात.

उत्तर कोरियाला भरीव मदत

भारताने अनेक प्रकरणी उत्तर कोरियाला मदत देखील केली आहे. उत्तर कोरियाचे सैन्याधिकारी, तंत्रज्ञान शिक्षण आणि मुत्सद्यांना प्रशिक्षित करण्यास मदत केली आहे. उत्तर कोरियात कोणतीही आपत्ती घडल्यास भारताने त्वरित मदत पोहोचवल्याचे नेहमीच दिसून आले. निर्बंध कमी होईपर्यंत भारत उत्तर कोरियाचा तिसऱया क्रमांकाचा व्यापारी भागीदार होता. परंतु यातील बहुतांश निर्बंध कायम राहणार असले तरीही कोणतीही संधी भारत गमावणार नाही हे निश्चित.सिंगापूर परिषदेचा आणखीन एक लाभ होणार आहे. उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील थेट संबंध चीनचा प्रभाव कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात. परंतु  हे त्वरित घडून येणार नाही. उत्तर कोरिया मुख्य प्रवाहात आल्यास ते भारतासाठी सहाय्यभूत ठरणार
आहे.