|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » काश्मीरमध्ये चकमक ; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये चकमक ; दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिह्यातील पनारच्या जंगलात चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद झाला आहे.

काश्मीरच्या उत्तरेकडील बांदीपोरात गेल्या सहा दिवसांपासून अनेकदा भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झडल्या. एएनआयच्या वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी पुन्हा दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झडली. यात जवानांनी दोन दहशतवाद्यांना टिपले. तर एक जवान शहीद झाला आहे. दरम्यान, पनारच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर 14 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी जंगलात शोध मोहीम हाती घेतली होती.

 

 

 

 

Related posts: