|Friday, May 24, 2019
You are here: Home » विविधा » अबब ! तब्बल ४० फुटांचा व्हेल मासा

अबब ! तब्बल ४० फुटांचा व्हेल मासा 

ऑनलाईन टीम / रायगड :

 रायगड जिल्हय़ातील उरणच्या पश्चिम किनारपट्टीवर मृत अवस्थेत अवाढव्य असा मृत मासा आढळला आहे. या व्हेल मास्याची लांबी सुमारे 35 ते 40 फूट असल्याची शक्यता आहे.

 

 उरणच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या खारदांडा या गावाजवळ बुधवारी संध्याकाळी एक अवाढव्य व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. तर आज सकाळी गावकऱयांनी मासा पाहिला. त्यानंतर हा मासा पाहण्यासाठी गावकऱयांनी गर्दी केली आहे. मृतावस्थेतील या महाकाय माशाचे तोंड थोडय़ाप्रमाणात कुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पाच ते सहा दिवसांपूर्वीच माशाचा मृत्यू झाल्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. या मृत माशामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी उरणच्या पिरवाडी समुद्रकिनारी हंपव्हेल प्रजातीचा सुमारे 40 फूट लांब मासा मृतावस्थेत आढळून आला होता. तर, दांडा गावाच्या हद्दीतही गेल्या दोन वर्षांपूर्वी कुजलेल्या अवस्थेतील व्हेल मासा आढळला होता.

Related posts: