|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » धवनचा अनोखा विक्रम, उपहाराआधी शतक ठोकणारा पहिला भारतीय

धवनचा अनोखा विक्रम, उपहाराआधी शतक ठोकणारा पहिला भारतीय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारताचा सलामीवीर शिखर धवनने खणखणीत शतक झळकावलं. पहिल्या दिवशीच उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन हा जगातील सहावा, तर पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. धवनने अवघ्या 87 चेंडूत शतक झळकावले.

उपहारापूर्वी खेळ थांबला त्यावेळी भारताने 27 षटकात बिनबाद 158 धावा केल्या होत्या. मुरली विजय 72 चेंडूत नाबाद 41 तर शिखर धवन 91 चेंडूत 104 धावांवर खेळत होता. या कसोटीत कर्णधार अजिंक्मय रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सलामीवीर धवन आणि मुरली विजयने सार्थ ठरवला. धवनने आधी 47 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मग त्याने धावगती वाढवत अवघ्या 87 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याच्या शतकाला 18 चौकार आणि तीन खणखणीत षटकारांचा साज होता. उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन पहिलाच भारतीय फलंदाज तर जगातील सहावा फलंदाज ठरला.