|Sunday, August 19, 2018
You are here: Home » Top News » हिटरमधील उकळते पाणी अंगावर सांडल्याने तीन चिमुकल्यांचा झोपेतच मृत्यू

हिटरमधील उकळते पाणी अंगावर सांडल्याने तीन चिमुकल्यांचा झोपेतच मृत्यू 

ऑनलाईन टीम / बीड :

हिटरचे उकळते पाणी अंगावर सांडल्याने तीन लहान मुलींचा मृत्यू झाला आहे. बीडमधील अंबाजोगाई तालुक्मयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात एक महिलाही गंभीर भाजली आहे.

अंबाजोगाई तालुक्मयातील भतानवाडीमध्ये ही घटना घडली आहे. गावात दोन दिवसापासून वीज नसल्याने सकाळी सुरू केलेल्या पाण्याच्या हिटरचे बटण तसेच सुरु होते. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वीज आली आणि हे हिटर सुरू झाला. त्यातील पाणी उकळून बाहेर आले. हे पाणी पडल्याने हिटर ठेवलेल्या स्टूलखालील सिमेंटचं गट्टू खचले आणि हिटर कलंडून उकळते पाणी जवळच गाढ झोपेत असणाऱया मुली आणि त्यांच्या मामींच्या अंगावर पडले. उकळते पाणी अंगावर सांडल्याने मुलींचा मृत्यू झाला. दरम्यान या दुर्घटनेत मुलींची मामी या घटनेत गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर लातूरमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related posts: