|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » मुंबई विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी

मुंबई विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

विद्यापीठ नामांतराचा वाद आणि चर्चा आता मुंबईत येऊन पोहोचली आहे. कारण मुंबई विद्यापीठाचे नाव राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ करा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी केली आहे. दत्ता नरवणकर यांनी त्याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेत सादर केला.

या प्रस्तावाला सर्वपक्षीय सहमती मिळेल, असा विश्वास दत्ता नरवणकर यांनी व्यक्त केला आहे. सध्या सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चर्चेत आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र हा वाद हायकोर्टात गेल्यानंतर नामांतर लांबणीवर पडले आहे.

Related posts: