|Sunday, August 19, 2018
You are here: Home » Top News » 26/11चा मास्टर माईंड अबू जुंदालचा जेलमध्येही मास्टर प्लॅन ?

26/11चा मास्टर माईंड अबू जुंदालचा जेलमध्येही मास्टर प्लॅन ? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईवरील 26/11 हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला दहशतवादी अबू जुंदाल, सध्या मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र त्याच्या कुरापती जेलमध्येही सुरुच आहेत.

26/11 हल्ल्याच्या मास्टर माईंडपैकी एक असलेला अबू जुंदाल सध्या ‘माईंड गेम’ खेळत आहे. जुंदाल भारतीय कायद्याचा वापर करत, आरटीआय अर्थात माहिती अधिकाराच्या सहाय्याने राजकीय माहिती गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे.पण थेट दहशतवादी कारवायात सहभागाचा आरोप असलेल्या अबू जुंदालला माहिती दिल्याने देशहिताला बाधा येऊ शकते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या माहिती अधिकाराचं अपिल फेटाळण्यात आले आहे.

 

 

 

 

Related posts: