|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » मोरोक्को-इराण लढत आज

मोरोक्को-इराण लढत आज 

वृत्तसंस्था /सेंट पीटर्सबर्ग:

फिफा फुटबॉल विश्वचषकातील ब गटात आज (दि. 15) मोरोक्को व इराण संघ आमनेसामने भिडतील. दोन्ही संघ या सर्वोच्च स्पर्धेत लढण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 8.30 वाजता या लढतीला प्रारंभ होईल. मोरोक्को व इराण हे दोन्ही संघ प्रामुख्याने बचावात्मक पवित्र्यावर भर देण्यासाठी ओळखले जातात. यापूर्वी आफ्रिकन पात्रता स्पर्धेच्या तिसऱया फेरीत मोरोक्को हा एकही गोल न स्वीकारणारा एकमेव संघ ठरला होता. इराणने देखील एएफसी पात्रता फेरीत सलग 9 लढतीत उत्तम कामगिरी साकारली होती. मोरोक्कोचा स्टार खेळाडू नबिर दिरारने तंदुरुस्ती सिद्ध केली असून तो या लढतीत उपलब्ध असेल. यापूर्वी, स्लोव्हाकिया व इस्टोनियाविरुद्ध मागील दोन मैत्रिपूर्ण लढतीत तो खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मोरोक्कोचा संघ विश्वचषकासाठी पाचव्यांदा पात्र ठरला. पण, 1998 नंतर ते प्रथमच या स्पर्धेत खेळत आहेत.

Related posts: