|Friday, September 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कलेला जीवन वाहिलेल्या कलाकारांमुळे कलाकार घडले

कलेला जीवन वाहिलेल्या कलाकारांमुळे कलाकार घडले 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील सर्व कलाकारांचा सन्मान व्हावा, मान मिळावा याला आपण प्राधान्य देत असून गोवा सरकारतफ्xढ अनेक योजना कलाकारांसाठी राबविण्यात आल्या आहेत. जोपर्यंत माणूस जीवंत आहे तोवर त्याचे गुणगान आपण गात नाही तर तो स्वर्गवासी झाल्यावर मग मात्र त्याचे गुणगान गातो. व्ंगभूमीला मान्यता नव्हती, प्रसिद्धी नव्हती अशावेळी प्रसाद सावकार यांनी नाटय़रंगभूमीची सेवा केली. कलेला जीवन वाहिलेल्या कलाकारांमुळे कलाकार घडले व घडत आहे असे प्रतिपादन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केले.

पद्मश्री प्रसाद सावकार यांच्या सात दशकांच्या नाटय़जीवनाच्या आठवणी असणाऱया ‘मी नाटकवाला’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कला व संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक अशोक परग, दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू, पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर, इन्स्टिटय़ुट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष संजय हरमलकर आणि ज्येष्ठ नाटय़कर्मी पद्मश्री प्रसाद सावकार उपस्थित होते. मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, आपल्याकडे असणाऱया गुणांचे सादरीकरण सर्वांसमोर केले पाहिजे. हे कार्य पैशासाठी नव्हे तर इतरांना आनंद देण्याच्या हेतुने केले पाहिजे. ग्रामीण भागात अनेक तरुण कलाकार आहेत. कला व संस्कृती संचालनालयातफ्xढ अनेक मार्गदर्शन कार्यक्रम तसेच विविध कार्यशाळाही होतात त्यात त्यांनी भाग घेऊन स्वतःला सादर केले पाहिजे. आजच्या प्रत्येक कलाकारांने आदर्श घ्यावा असे प्रसाद सावकार आहेत. कला आपल्याला कुणासाठी आणि का जगावे हे शिकवते असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रसाद सावकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, आपण रंगभूमीवर गेली 70 वर्षे वावरत आहोत. नाटकात गीत गाऊनच आपण प्रवेश केलेला आहे. आपल्या नाटय़जीवनावर आधारित असे एक पुस्तक येणार असे वाटले नव्हते पण हे केवह अजय वैद्यांमुळे शक्य झाले. वैद्यांनी परेश प्रभू यांचे नाव संपादक म्हणून सूचवले व ते शक्य झाले. हे आपले आत्मचरित्र नाही तर आपल्या जीवनात घडलेल्या प्रसंगांचे वर्णय आणि गंमतीजमती यात आहेत. तसेच याचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे प्रसिद्ध अभिनेता आणि साहित्यिक नाना पाटेकर यांनीही आपल्यावर एक या पुस्तकात लिहिला आहे.

संजय हरमलकर यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले तसेच परेश प्रभू यांनी पूस्तकावर भाष्य केले. पुस्तक प्रकाशनानंतर प्रसाद सावकार यांनी दिग्दर्शित केलेल्या सुमधुर नाटय़संगीताचा कार्यक्रम पार पडला. मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते शाल, श्रीफ्ढळ आणि मानचिन्ह देऊन प्रसाद सावकार यांचा सन्मान करण्यात आला.