|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आठवडय़ापासून पाऊस सुट्टीवर

आठवडय़ापासून पाऊस सुट्टीवर 

प्रतिनिधी/ सोलापूर

हवामान खात्याने 12 जून नंतर पाऊस दिर्घकाळासाठी सुट्टीवर जाणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरण्याच्या मार्गावर आहे. कारण, 11 जून पासून सोलापूर जिह्यात पावसाचा एकही टिपूस पडला नाही. पाऊस सुट्टीवर गेला असल्याचेच चित्र पहायला मिळत आहे.

यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्याच आठवडय़ात सोलापूर शहर-जिह्यात पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. जूनच्या पहिल्याचा आठवडय़ात 42 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली होती. विशेष म्हणजे हा पाऊस जिह्यात सर्वदूर कोसळला होता.

अशीच पावसाची बरसात कायम राहिल्यास जमिनीत ओलावा निर्माण होवून, खरीपाच्या पेरणी योग्य स्थिती निर्माण होईल अशा अशाही शेतकऱयांना होत्या. त्यानुसारच ग्रामीण भागामध्ये खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामाला जोरही आला होता. या आठवडय़ात पावसाने दमदार हजेरी लावली असती, तर शेतकऱयांनी खरीपाच्या पेरण्या करण्यास सुरुवात केली असती. परंतु, अचानक हवामानातील बदलामुळे शेतकऱयांच्या उत्सहावर पाणी फ्sढरले.

 12 जून नंतर राज्यातील मान्सूनचा जोर कमी होईल, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पाऊस अत्यप पडेल. तसेच वातावरणातील तापमानात वाढ होईल असा अंदजा हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरण्याच्या मार्गावर आहे. 11 जून पासून जिह्यातील पाऊस गायब झाला आहे. तसेच तापमानातही वाढ झाली आहे.

खरीपाच्या पेरण्या लांबणीवर

पावसाने अशाच पध्दतीने दडी मारल्यास खरीपातील पेरण्यांना उशीर होणार आहे. जोपर्यंत दमदार पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकरीही पेरण्या करण्याचे धाडस करणार नाहीत. कारण, पेरणीची घाई केल्यास शेतकऱयांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागून, आर्थिक संकट ओढावून घ्यावे लागेल.

Related posts: