|Sunday, January 26, 2020
You are here: Home » leadingnews » येत्या 24 तासात मुंबई, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

येत्या 24 तासात मुंबई, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई, ठाणे आणि कोकणात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्मयता हवामान विभागानं वर्तवली आहे. कालही मुंबई आणि कोकणात पावसानं हजेरी लावली. जूनच्या पहिल्याच आठवडय़ात मान्सून महाराष्ट्रात धडकला, मात्र त्यानंतर पावसानं उसंत घेतल्यानं बळीराजा चिंतेत होता. मात्र पुन्हा पावसानं दमदार एन्ट्री घेतल्यानं शेतकऱयांनाही दिलासा मिळणार आह

मानसूनच्या पावसात खंड पडल्याने राज्यभरात पेरणीही रखडली होती. जोरदार सुरुवात केलेला मान्सून दडून बसल्याने राज्यातील शेतकरी काहीसा चिंताग्रस्त झाला होता. मात्र येत्या काही दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्मयता आहे. येत्या 24 तासात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. तर उर्वरीत राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे.

 

Related posts: