|Friday, February 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » “झिंग प्रेमाची” २९ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित!

“झिंग प्रेमाची” २९ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित! 

ऑनलाइन टीम / मुंबई :

प्रेम एक अशी भावना आहे की वर्षानुवर्षे त्यावर जगभरातील चित्रकर्मी चित्रपट बनवीत आलेत आणि पुढेही बनवतील. प्रेमात असलेल्या व्यक्ती अंगावर मोरपीस फिरवल्याप्रमाणे वावरत असतात. त्यांना संपूर्ण जग सुंदर दिसत असतं आणि प्रत्येक व्यक्ती चांगली. थोडक्यात ते त्यांना प्रेमाची झिंग असल्यामुळे भासत असतं. अशाच मानसिकतेवर आधारित चित्रपट आहे ‘झिंग प्रेमाची’.

विजय उषा बॅनरखाली निर्माते विजयकुमार सपकाळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून या सांगीतिक रोमँटिक लव्ह स्टोरीचं दिग्दर्शन केलंय शाहिद खान यांनी व्ह्यूफाईंडर प्रॉडक्शनच्या अंतर्गत. बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून नावाजलेले शाहिद खान यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लिहिले असून त्यांचं ‘झिंग प्रेमाची’ चित्रपटातून मराठी दिग्दर्शकीय पदार्पण होत आहे. या चित्रपटात संगीताचे बरेच महत्व असून महेश-राकेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे व गीतं विजय गमरे आणि शाहिद खान यांच्या लेखणीतून उतरली आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून त्यातील एक सुफ़ी सॉंग येणाऱ्या रमजान ईद मुळे अजूनच खास झालंय.

या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील गाणी ताज महाल आणि लाल किल्ला सारख्या ऐतिहासिक ठिकाणी चित्रित करण्यात आली आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महाल ला निखळ प्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि याच ठिकाणी या चित्रपटातील प्रेमींवर गाणं चित्रित झाल्यामुळे ‘झिंग प्रेमाची’ सिनेमामध्ये रोमान्स ची उच्च अनुभूती अनुभवायला मिळणार आहे. 

Related posts: