|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दक्षिण कोरियाने सुरू केला दोन दिवसीय युद्धाभ्यास

दक्षिण कोरियाने सुरू केला दोन दिवसीय युद्धाभ्यास 

सेऊल

 जपान सागरात स्थित वादग्रस्त बेटसमूह दोकदोच्या रक्षणाच्या उद्देशाने दक्षिण कोरियाने सोमवारी दोन दिवसीय युद्धाभ्यास सुरू केला. दोकदोवरून दक्षिण कोरिया आणि जपानदरम्यान दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. कोरियन उपखंडात 1945 मध्ये जपानच्या शासनाच्या अंतापासूनच या बेटसमूहावर दक्षिण कोरियाचे नियंत्रण आहे. जपानमध्ये याला ताकेशिमा म्हटले जाते. दक्षिण कोरियाने यावर अवैध कब्जा केल्याचा आरोप जपानकडून केला जातो. उत्तर कोरियाच्या आक्षेपानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियासोबतचा संयुक्त सैन्याभ्यास न करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने या युद्धाभ्यासास प्रारंभ केला आहे. दोकदो सुरक्षा अभ्यास बाहेरील आक्रमणापासून वाचण्यासाठी नियमितपणे केला जात असल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला. तर जपानने या युद्धाभ्यासावर कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून युद्धाभ्यासाला जोरदार विरोध केला आहे. अशाप्रकारचा सैन्याभ्यास पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. आम्ही तो बंद करण्याची मागणी करत असल्याचे जपानच्या विदेश मंत्रालयाने म्हटले.

1986 मध्ये जपानच्या आक्रमणाच्या भीतीपोटी दक्षिण कोरियाने पहिल्यांदा सैन्याभ्यासाची सुरुवात केली होती. तेव्हापासून दर दोन वर्षांनी याचे आयोजन केले जाते.