|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हसापूरे अन् शिवदारेंच्या आग्रहाखातर बाजार समितीवर कारवाई

हसापूरे अन् शिवदारेंच्या आग्रहाखातर बाजार समितीवर कारवाई 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे तत्कालिन संचालक सुरेश हसापूरे आणि राजशेखर शिवदारे यांनीच बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करीत कारवाई करावी असा आग्रह केला होता. त्यांच्या आग्रहाखातरच बाजार समितीची चौकशी करीत कारवाई केली असून, त्यात आपला काहीच राजकीय होतू नसल्याची स्पष्टोक्ती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली. सोमवारी श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात मंत्री देशमुख यांची पत्रकार परिषद पार पडली. केंद्रातील भाजप सरकारच्या 4 वर्षांच्या पूर्तीनिमित्त सहकारमंत्री देशमुख प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी देशमुख यांनी विरोधकांचा आरोप खोडत काढत प्रती हल्ला केला.

सध्या बाजार समितीची निवडणूक लागली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सूडबुध्दीने सहकारमंत्री देशमुख यांनी बाजार समितीच्या संचालकांवर कारवाई केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर आपले म्हणणे काय असा सवाल पत्रकारांनी देशमुख यांना विचारला. त्यावेळी उत्तर देताना देशमुख यांनी विरोधकांच्या आग्रहाखातर कारवाई केल्याचे सांगत, खळबळ उडवून दिली.

 सहकारमंत्री देशमुख म्हणाले की, गेल्या चार वर्षामध्ये केंद्रातील भाजप सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सामान्य जनतेच्या विकासाला चालना देणारे अनेक निर्णय घेतले. त्यामुळे जनता पंतप्रधान आणि सरकारवर खुश आहे. शेती, उद्योग, सेवा अशा अनेक क्षेत्रात सरकारने समाधानकारक काम केले आहे. असे सांगत, विरोधक फ्ढक्त टिका करण्यात धन्यता मानत आहेत. अशी टिका त्यांनी विरोधकांवर केली.

सर्व विरोधक मिळून मोदी हटाव असा नारा देत आहेत. परंतु, पंतप्रधान मोदी गरिबी आणि भ्रष्टाचार हटाओचा नारा देत आहेत. गेल्या चार वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप मोदी सरकारवर झाला नसल्याचे यावेळी सांगितले.

जिल्हा बँकेवर कारवाईशी आपला संबंध नाही

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करत, बँकेवर प्रशासक नेमण्याची कारवाई सरकारकडून करण्यात आली. या कारवाई नंतर विरोधक देशमुख यांच्यावर टिका करत आहेत. याबाबत देशमुख यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, जिल्हा बँकेवर रिझर्व बँकेच्या निर्देशानुसारच कारवाई केली आहे. सहकार विभाग फ्ढक्त मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. असेही देशमुख यावेळी म्हणाले.

माझे कुणीही नाही

पक्षाच्या धोरणानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या सध्याच्या महापौर यांचा कार्यकाळ सव्वा वर्षांचाच होता. सव्वा वर्षानंतर महापौर बदलणे अपेक्षित होते. परंतु, भाजपात गट बसल्यानेच महापौर बदलला जात नाही. असे देशमुख यांना विचारले असता, भाजपामध्ये गट नाहीत. सगळे भाजपाचे आहेत. माझेही कुणी नाही. अशी पुष्ठीही त्यांनी यावेळी जोडली.

Related posts: