|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रंकाळा प्रदूषणाने कासवाचा बळी

रंकाळा प्रदूषणाने कासवाचा बळी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

रंकाळा तलावाचे होत असलेले प्रदूषण तलावातील जलचरांच्या जीवावर बेतत आहे. याचा परिणाम म्हणून 100 वर्षाच्या कासवाचा मृत्यू झाला.

सोमवारी दुपारी स्थानिक तरुणांना रंकाळयात पाण्यावर तरंगताना कासव आढळले. ही माहिती रंकाळा बचाव समितीला कळाल्यावर समितीचे शाहीर राजू राऊत, अमर जाधव, राजू पाटील यांनी कासवाला पाण्यातून बाहेर काढले. साडेचार फूट लांबीचे कासव असून वजन सुमारे 90 किलो आहे.  हे  कासव दुर्मिळ असल्याचे पर्यावरण तज्ञांचा अंदाज आहे. रंकाळा तलावाच्या प्रदूषणामुळे यापूर्वी अनेक वेळा माशांचा मृत्यू झाला आहे. आता कासवासारख्या जलचरांचा मृत्यू होत असेल तर तलावातील जैवविविधता संपत चालल्याचे हे द्योतक आहे.

 रंकाळा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे.पण  तलावात परिसरातील सांडपाणी मिसळून तलावाचे प्रदूषण होत आहे. यामुळे पर्यटकांना पर्यटनाऐवजी पाण्याच्या दुर्गंधीचे पर्यटन करावे लागत असून त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. रंकाळा हे विविध जातीचे पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी यांचे आश्रयस्थान आहे. पण तलावाच्या प्रदूषणामुळे या जलचरांना किंमत मोजावी लागत आहे.

Related posts: