|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारा ‘रमाई’मध्ये राज्यात प्रथम

सातारा ‘रमाई’मध्ये राज्यात प्रथम 

जिल्हा परिषद साताऱयाचे सातत्याचा पाठपुरावा

विशाल कदम/ सातारा

तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सातारा जिह्याचे नाव राज्यात घरकुलमध्ये आले पाहिजे. याच, उद्देशाने जो पाया रोवला. तेच काम पुढे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सुरु ठेवल्याने प्रधानमंत्री आवास योजनेतून गेल्या दोन वर्षात तब्बल 4 हजार 209 घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. राज्यात सध्या दोन नंबरला सातारा जिल्हा आहे, तर रमाई घरकुलामध्ये 1 हजार 673 घरकुले पूर्ण केल्याने प्रथम क्रमांकास जिल्हा आहे. सातारा जिह्यात घरकुलांच्या प्रस्तावाबाबत ज्या अडचणी होत्या. त्या संबंधी नुकतीच मंत्रालयात एक बैठक झाल्याचे समजते. त्या बैठकीत सीईओ डॉ. कैलास शिंदे यांनी प्रखरपणे सूचना मांडल्या. त्यामुळे रखडलेली घरकुलेही लवकरच मार्गी लागणार आहेत.

सातारा जिल्हा, शासकीय योजना राबवण्यामध्ये कधीही मागे पडत नाही. याची अनेक उदाहरणे आहेत. हेच हेरुन तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सातारा जिह्यात प्रधानमंत्री घरकुल योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी एक आराखडा ठरवला होता. त्याप्रमाणे त्यांनी कार्यक्रमही सुरु केला, परंतु त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी आलेले डॉ. कैलास शिंदे यांनी सातारा जिह्यामध्ये ही योजना यशस्वी करण्यासाठी आराखडाच तयार केला. त्यांच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली होती. घरकुल
प्रकरणामध्ये अनेक अडचणी येतात. तरीही त्यामध्ये कसा मार्ग निघेल? यासाठी  शासनाचे मार्गदर्शन घेवून लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्यामध्ये यश येत आहे. यात काही अडचणी होत्या. त्यासाठी गेल्या आठवडय़ामध्ये मंत्रालयात घरकुल आवास योजनेच्या अनुषंगाने बैठक झाली. त्यामध्ये सीईओ डॉ. शिंदे यांनी येणाऱया अडचणी प्रखरपणे मांडल्याचे समजते. त्यामध्ये सातारा जिह्याचे स्टेट्स सांगितल्यावर सातारा जिल्हा हा घरकुलामध्ये रमाईमध्ये प्रथम, तर प्रधानमंत्री आवासमध्ये द्वितीय असल्याचे समजले.

पारधी अन् शबरीला अल्प प्रतिसाद

शबरी आणि पारधी योजनेमध्ये अल्प प्रतिसाद मिळत आहे. 2016-17 मध्ये 60 उद्दिष्ट होते. त्यापैकी 58 पूर्ण झाले. 2017-18 मध्ये 22 उद्दिष्ट होते. त्यापैकी एकही पूर्ण झाले नाही. पारधीमध्ये 2016-17 मध्ये 4 उद्दिष्ट होते. त्यापैकी 2 पूर्ण झाले. 2017-18 मध्ये एकही पूर्ण झाले नाही, त्यामुळे सातारा जिह्यात या योजनांसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.a

Related posts: