|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » देशभरात योगोत्सव , पंतप्रधानांचा देहरादूनमध्ये तर मुख्यमंत्र्यांचा मुंबईत योगा

देशभरात योगोत्सव , पंतप्रधानांचा देहरादूनमध्ये तर मुख्यमंत्र्यांचा मुंबईत योगा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. देशभरात यानिमित्तने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहरादनमध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत योगासाने करून योग दिन साजरा केला.

देहरादूनच्या वन संशोधन संस्थेत योग दिनानिमित्त देशातील सर्वात मोठा कार्यक्रम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमात जवळजवळ 55 हजार जणांचा सहभाग झाला आहे. तसेच जगातला प्रत्येक नागरिक योगाला आपलंसं करत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली.

 

याशिवाय योगदिनानिमित्त राज्यभरात कार्यक्रम होणार आहेत. राजस्थानच्या कोटामध्ये योगगुरू बाबा रामदेव 2 लाख नागरिकांसोबत योग करणार आहेत. यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील उपस्थितीत होत्या. 2 लाख जण एकत्रित योगा करत असल्याची ही पहिलीच वेळ असल्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची टीमही या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.