|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » पुणे-मुंबई शिवनेरी बस उलटली, 5 जखमी

पुणे-मुंबई शिवनेरी बस उलटली, 5 जखमी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱया शिवनेरी बसचा सायन-पनवेल महामार्गावर अपघात ^झाला आहे. सानापाडा रेल्वे स्थानकासमोर एका दुचाकीस्वाराला वाचवताना बस दुभाजकावर आदळून उलटली. या अपघातात 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

सुमारे 11.45 वाजता हा अपघात घडला. या बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते. त्यापैकी पाच प्रवाशांना किरकोळ मार लागला. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱयांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून शिवशाही बसला अपघात झाल्याच्या घटना घडल्या. त्यात आज शिवनेरी बसला अपघात झाला आहे.