|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नांगरणी करताना शेतकऱयाचा मृत्यू

नांगरणी करताना शेतकऱयाचा मृत्यू 

कोकिसरे बांधवाडी येथील घटना

प्रतिनिधी / वैभववाडी:

कोकिसरे बांधवाडी येथील एकनाथ रामचंद्र परबते (49) या शेतकऱयाचा शेतात नांगरणी करत असताना अचानक फिट आल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

शुक्रवारी दुपारी भात लावणीला जमीन तयार करण्यासाठी जोत बांधत असताना परबते यांना अचानक फिट आली आणि जमिनीवरील चिखलात कोसळले. तेथेच काही अंतरावर परबते यांची पत्नी काम करत होत्या. अचानक त्यांचा लक्ष शेतात उभ्या असलेल्या बैलांकडे गेला. तेथे त्यांना पती चिखलात निपचित पडलेले दिसले. तिने आरडाओरडा केला असता नजीकच्या ग्रामस्थांनी धाव घेतली. परबते यांना चिखलमय जमिनीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने परबते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.