|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » सॉफ्टवेअर बिघाडामुळे ‘एअर इंडिया’ला ब्रेक

सॉफ्टवेअर बिघाडामुळे ‘एअर इंडिया’ला ब्रेक 

नवी दिल्ली :

एअर इंडिया या विमान कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणामुळे शनिवारी 23 हून अधिक विमानफेऱयांची उड्डाणे विलंबाने झाली. दिल्लीतील विमानतळावर इंटरनेट सेवा व अंतर्गत यंत्रणा काहीकाळ कोलमडल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होते. विमान उड्डाणाच्या निर्धारित वेळेत 15 ते 30 मिनिटांचा विलंब होत असल्याचे यावेळी पहावयास मिळाले. याची दखल घेऊन कंपनीच्या तांत्रिक विभागाद्वारे संबंधित समस्येचे कारण शोधण्यासाठी प्रयत्न चालू ठेवण्यात आले असल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली. कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमानांना विलंब होत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

Related posts: