|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तपोभूमीने रचला नवा इतिहास

तपोभूमीने रचला नवा इतिहास 

प्रतिनिधी/ पणजी

चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन विश्व भरसाजरा होत असताना श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी संचालित संस्था सदगुरू ज्ञानपीठ, सद्गुरू फाउंडेशन तथा सद्गुरू योग गुरूकुल तसेच सेंट्रल कौसिल ऑफ रिसर्च इन योग अँड नॅचुरोपैथी यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रात 500 ठिकाणी 300 योग शिक्षकांच्या सहयोगाने योग दिवस साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय धर्मगुरू, धर्मभूषण पू. सद्गुरू बह्मेशानन्दाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने व मार्गदर्शनाने गोवा राज्यातील राजभवन, विमानतळ, रेल्वेस्थानके, मिलिटरी कॅम्प फोंडा, एन. आय. ओ. समुद्रकिनारे, शाळा, महाविद्यालये, पंचायत, मंदिरे, चर्च, ग्रंथालये विविध व्यावसायिक कंपन्या इत्यादि ठिकाणी योग दिवस साजरा झाला.

योग म्हणजे जोडणे, आणि आज खरोखरच योग दिनाच्या निमित्ताने पू. सद्गुरूच्या मार्गदर्शनाने राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक अश्या विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तींचा जणू योग जुळून आला. अनेक क्षेत्रातील, धर्मातील लोकांनी एकत्र येऊन उत्साहाने योग दिवस साजरा केला व जगाला एकात्मतेचा संदेश दिला. तसेच स्वास्थ्य रक्षणासाठी योग शास्त्राचा अभ्यास प्रत्येकाने करावा असे आवाहन सर्व योगशिक्षकांनी केले.