|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » ओव्हरटेक करताना अपघात, तीन विद्यर्थ्यांचा मृत्यू

ओव्हरटेक करताना अपघात, तीन विद्यर्थ्यांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / बेळगाव :

ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात तीन विद्यर्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बेळगावात घडली आहे.

दुचाकीवरुन इंजिनियरिंग कॉलेजचे तीन विद्यार्थी खानापूरकडे निघाले होते. प्रभुनगर जवळ वाहनाला ओव्हरटेक करताना हा भीषण अपघात घडला.दुचाकीवरील तीनही तरुण जोरदार धडकेमुळे फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तिघेही इंजिनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे तीनही तरुण पंचवीस फूट दूर फेकले गेले. त्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.