|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जयसिंगपूरमध्ये धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

जयसिंगपूरमध्ये धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

सद्या जिह्यात सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांची वसतीगृहे आहेत. परंतू, धनगर समाजाचे अजूनही वसतीगृह नाही. धनगर समाजोन्नती मंडळाने घेतलेल्या जागेत जे विद्यार्थी वसतीगृहे बांधण्यात येणार आहे. त्यास माझ्यासह उपस्थित सर्वच मान्यवर सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी ग्वाही दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष उद्यानपं†िडत गणपतराव पाटील यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा धनगर समाजोन्नती मंडळ व शिरोळ तालुका अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वी, 12 वी तसेच स्पर्धा परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या जिह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शुक्रवारी पार पडला. जयसिंगपूर येथील तेरापंथी भवनमध्ये झालेल्या समारंभात अध्यक्षपदावरून पाटील बोलत हाते.

पाटील म्हणाले, सद्या अनेक मुले शिकून पुढे येत आहेत. अनेकजण चांगले अधिकारी झाले, कुणी छोटे-मोठे उद्योजक झाले, पण माणसाला खऱया अर्थाने जगवणारा शेती हाच मुलभूत व्यवसाय आहे. त्यामुळे शेतीला कमी न लेखता शिकलेल्या तरूणांनी शेतीचा व्यवसाय देखील चांगल्याप्रकारे केला पाहिजे. आपल्या ज्ञानाचा वापर केल्यास शेतीतही चांगले उत्पन्न मिळविता येते. असे सांगून सद्या पॅन्सरचे तालुक्याला विळखा घातला आहे. तेव्हा भविष्यात आपल्या घरापर्यंत हा रोग येणार नाही याची दक्षता सर्वांनीच घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

शरद कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, शिक्षण व्यवस्थेत सद्या अमुलाग्र बदल होत आहेत. सरकारच्या बदलत्या धोरणामुळे शिक्षण संस्था चालवणे अवघड होत आहेत. जशी गुणवत्ता वाढते, तशी मुले सक्षम बनली पाहिजेत. अंतिम उद्दिष्ट निश्चित करून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्व. डॉ. सा. रे. पाटील यांचे धनगर समाजाचे वसतीगृह व्हावे हे स्वप्न होते. त्याकरिता त्यांनी जागा घेण्यास समाजाला सहकार्य केले होते. तशाचप्रकारे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वसतीगृह बांधकामासाठी सहकार्य करू, असे आश्वासनही यड्रावकर यांनी दिले.

धनगर हा गरीब नसून तो मनाने मोठा आहे. एवढेच नव्हे तर माझ्यासारख्या दगडाला घडविणारे शिक्षकही धनगर समाजाचेच होते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख चढता रहावा, याकरिता अशोकराव कोळेकर व त्यांच्या सहकाऱयांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार आमदार उल्हास पाटील यांनी काढणे आणि वसतीगृहाच्या बांधकामासाठी शासनस्तरावर केलेल्या प्रयत्नांची माहिती देवून यापुढेही याकाही सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

जयसिंगपूरचे डिवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी खडतर परिस्थितीतून आपण यशाचे शिखर कशाप्रकारे गाठले याची जीवनपटच मांडला. कमी मार्क मिळाले म्हणून नाराज होवू नका, कमी मार्क मिळणे ही एक संधी असते, तिचा भावी जीवनात उपयोग करून यश मिळवा. पण यशाचे वारे कानात शिरू देवू नका. सकारात्मक विचारातून माणूस मोठे कार्य करू शकतो. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून यश प्राप्त करावे, असे आवाहन पिंगळे यांनी केले.

जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांनीही वसतीगृह बांधकामास तसेच समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता मदत करण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्षा डॉ. निता माने म्हणाल्या, मिळालेली गुणवत्ता आणि त्यातून होणारा सत्कारही सर्वांगिणपणे समाजाशी एकरूप होण्याची विद्यार्थ्यांना एक संधी असते. यापुढेही पालकांनी आपल्या मुलांना वाढदिवसानिमित्त वस्तुंची भेट न देता चांगले पुस्तके भेट द्यावे, असे आवाहन करून शहरात लवकरच स्व. डॉ. सा. रे. पाटील यांच्या नावाने सुसज्ज असे ग्रंथालय नगरपालिकेमार्फत उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.

मंडळाचे माजी अध्यक्ष कल्लाप्पा गावडे, नारायणदास बलदवा, प्रा. बी. डी. सावगांवे यांनी मनोगते व्यक्त केले. कुरूंदवाड येथील ज्ञानभारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब सावगावे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक परिक्षा महाराष्ट्र सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या हरिष पाटील, सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या रूपाली सावगांवे, नारायण रानगे, राज्यस्तरीय कुस्तीपटू ऋषिकेश पुजारी, श्रावणी शेळके, पैलवान राहुल पुजारी, उंच उडीत सुवर्णकन्या ठरलेल्या स्फुर्ती माने यांच्यासह दहावी, बारावी परिक्षेतील गुणवत्ता प्राप्त 345 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

स्वागत अहिल्यादेवी महिला मंडळाच्या संघटक स्नेहा कोळेकर यांनी केले. प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष अशोकराव कोळेकर यांनी केले. मंडळाचे कार्याध्यक्ष बाबूराव हजारे, सर्जेराव शिंदे, रामचंद्र सिंध, सीमा म्हैशाळे, उज्वला बदामे, संजय खोत, रामचंद्र मोहिते, सदाशिव पोपळकर, नगरसेवक पराग पाटील, दत्ता कुंभोजे, सोमा गावडे, गजानन करे, तानाजी हराळे, शिरोळ पंचायत समितीचे उपसभापती संजय माने, शिवाजी बिडकर, सुवर्णा अपराज, संदीप कारंडे, विकास घागरे, मच्छिंद्र बनसोडे, दत्ता पुजारी, नागेश पुजारी, राजू पुजारी, बत्ते आण्णा, जितेंद्र म्हैशाळे, कृष्णा पुजारी, लक्ष्मण कोळेकर, आण्णाप्पा फलटणे यांच्यासह जिह्यातील अनेक कार्यकर्ते विद्यार्थी, पालक व समाज बांधव उपस्थित होते.

 

Related posts: