|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » प्लास्टिकबंदीविरोधात पुण्यात मिठाईची दुकाने बंद

प्लास्टिकबंदीविरोधात पुण्यात मिठाईची दुकाने बंद 

ऑनलाईन टीम / पुणे :

सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या धोरणा विरोध करण्यासाठी पुणे मिठाई फरसाण डेअरी असोसिएशने आज बंदु पुकारला आहे. या विरोधात आज व्यापाऱयांनी पुणे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. चितळे बंधूही या बंदात सहभागी झाले आहे.

सरकारने सरसकट प्लॅस्टिकबंदी केली आहे. कोणते प्लॅस्टिक वापरायचे आणि कोणते नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. प्रशासकीय अधिकाऱयांकडून दंड वसूल केला जातो पण त्याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे.

 

मिठाई, डेअरी आणि फरसाण व्यावसायिकांना प्लॅस्टिकबंदीचा मोठा फटका बसत आहे. प्लॅस्टिकबंदी करताना सरकारने कोणताही पर्यायही उपलब्ध करून दिलेला नाही. म्हणुनच पुणे मिठाई, फरसाण आणि डेअरी असोसिएशनने आज बंद पुकारला आहे. सरकारने धोरण न सुधारल्यास बेमुदत बंद करण्याचा इशाराही असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे.