|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुसळधार पावसात पदवीधरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुसळधार पावसात पदवीधरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक

रत्नागिरी जिल्ह्य़ात 80 टक्के मतदान

गुरूवारी ठरणार कोकणचा ‘ठाणेदार’

प्रतिनिधी /रत्नागिरी

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी सोमवारी मुसधळधार पावसातही मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. जिल्हय़ात 80 टक्के मतदान झाले असून कोण बाजी मारणार हे 28 जूनला स्पष्ट होणार आहे. भाजपचे निरंजन डावखरे, शिवसेनेचे संजय मोरे व राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

जिल्हय़ातील एकूण 16 हजार 222 मतदारांना कॅच करण्यासाठी भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना आणि कुणबी समाजोन्नती संघासह सर्वच उमेदवारांनी जोरदार व्युहरचना केली हेती. शिवसेना प्रथमच ही निवडणूक लढवत असून जोरदार आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सेनेने केला आहे. .

भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा कोकण पदवीधर मतदार संघ गतवेळी राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी भाजपकडू हिसकावून घेतला आहे. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपच्या तंबूत प्रवेश केला. विद्यमान आमदार डावखरे यावेळी भाजपकडून रिंगणात आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने प्रथमच या निवडणुकीत उडी घेताना ठाण्याचे माजी महापौर संजय मेरे यांच्या रूपाने तगडा उमेदवार रेगणात उतरवला आहे. डावखरेंनी अचानक केलेल्या पक्षबदलाने दुखावलेल्या राष्ट्रवादीने नजीब मुल्लांच्या रूपाने आव्हान जिवंत ठेवले आहे. कुणबी समाजच्या अपक्ष उमेदवार सुवर्णा पाटील यांच्या उमेदवारीचा कोणाला फटका बसणार याकडे लक्ष लागले आहे.

सोमवारी झालेल्या मतदानासाठी मंडणगड 1, दापोली 2, खेड 3, चिपळूण 5, रत्नागिरी 7, गुहागर 1, संगमेश्वर 4, लांजा 1, राजापूर 2 अशी जिल्हय़ात 26 मतदान केंद्रावर मतदान झाले. बहुतेक ठिकाणी दिवसभर मुसळधार पाऊस असतानाही मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राथमिक माहितीनुसार जिल्हय़ात 80 टक्केच्या आसपास मतदान झाले.

रत्नागिरीत शिवसेना उपनेते उदय सामंत, भाजपाकडून आमदार प्रसाद लाड पदाधिकाऱयांसह ठाण मांडून होते. रत्नागिरीत जांभेकर महिला विद्यालय येथे मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या. येथील मतदान केंद्राबाहेर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही मोठी गर्दी केलेली होती.

Related posts: