|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » पिवोटचेन सोल्यूशन्समध्ये मोबीक्विकने गुंतवले 2 कोटी

पिवोटचेन सोल्यूशन्समध्ये मोबीक्विकने गुंतवले 2 कोटी 

प्रतिनिधी / पुणे

फिनटेक पोर्टफोलिओ आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने भारताच्या अग्रणी फूल स्टॅक फिनटेक प्लॅटफॉर्म असलेल्या मोबिक्विकने पुणे येथील डाटा विज्ञान कंपनी पिवोटचेन सोल्यूशन्समध्ये 2 कोटी रुपयांच्या धोरणात्मक गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

पिवोटचेन ही एक सूचक विश्लेषणात्मक कंपनी आहे. जी यांत्रिक शिकवण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी मोबिक्विकसाठी विशेष एआय आणि सखोल शिकवण नमुन्यांची निर्मिती केली आहे. हे नमुने मोबिक्विकसाठी महत्त्वपूर्ण ठरतील. याचे कारण म्हणजे ते त्यांच्या युजरच्या गरजा पूर्ण करण्यास विविध कर्ज उत्पादने सादर करीत आहेत. धोरणात्मक गुंतवणुकीबद्दल बोलताना बिपिन प्रीत सिंह, संस्थापक आणि सीईओ, मोबिक्विक म्हणाले, या गुंतवणूकीद्वारे आम्ही अन्य स्पर्धकांपेक्षा निश्चितच उत्तम ठरू शकतो. आमच्या व्यवसायामध्ये मूल्याची भर घालणाऱया कंपन्यांमध्ये आम्ही गुंतवणूक सुरू ठेवू.