|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » काँग्रेसकडून द्वेषाचे राजकारण

काँग्रेसकडून द्वेषाचे राजकारण 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेसकडून आजही द्वेषाचे आणि समाजात दुही माजविण्याचे राजकारण सुरू आहे. पक्षाचे नेते दिग्विजय सिंग यांनी ‘हिंदू’ असा शब्दच अस्तित्वात नसल्याचे म्हटले आहे. या विधानाने देशातील समस्त हिंदूंचा अवमान झाला आहे, अशा शब्दात भाजपने सोमवारी हल्लाबोल केला.

 25 जून 1975 रोजी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. हा दिवस भाजपकडून काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, देशात आणीबाणीच्या काळात तत्कालीन काँग्रेस अध्यक्षांनी ‘इंडिया इज इंदिरा’, अशी घोषणा दिली होती. मात्र हिंदुत्व मानणाऱयांसाठी देश केवळ भारत माता आहे. काँग्रेससाठी इंदिरा म्हणजे भारत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

  इंदिरा गांधी यांच्या सरकारने 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू केली होती. जर्मनीमध्ये हुकूमशाह हिटलरने ‘हिटलर इज जर्मनी’ अशी घोषणा दिली होती. तशीच आणीबाणीच्या काळात ‘इंडिया इज इंदिरा’, अशी घोषणा दिली. आजही याबाबत काँग्रेसने माफी मागितलेली नाही, असेही ते म्हणाले.

 हिंदू असा शब्दच अस्तित्वात नसल्याचे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी खुलासा करावा. त्यांचे आजोबा व देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रसिद्ध ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथात हिंदू शब्दचा उल्लेख आहे. दिग्विजय सिंह यांचे विधान हिंदू आणि हिंदुत्व याचा अवमान करणारे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Related posts: