|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शेतकऱयांच्या विद्युत पंपांना वीज पुरवठा करा

शेतकऱयांच्या विद्युत पंपांना वीज पुरवठा करा 

प्रतिनिधी/ बेळगाव

शेतकऱयांनी विद्युत पंपसाठी विज जोडणी करुन घेतली होती. मात्र ती जोडणी बऱयाच वर्षांपासून तोडली आहे. याबाबत केईबीकडे पाठपुरावा करुन देखील ती जोडली जात नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याचबरोबर सरकारने कर्जमाफी जाहीर केली. मात्र ही कर्जमाफी फसवी असून सर्वसामान्य शेतकऱयांना त्याचा काहीच फायदा नाही. तेंव्हा सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

शिवारातील विहिरी व कुपनलिकांसाठी विद्युत पंपांची जोडणी केली होती. मात्र त्यानंतर अनेक विद्युत पंप बंद पडले होते. त्यानंतर शेतकऱयांनी पुन्हा त्याची जोडणी केली आहे. पण विद्युत पुरवठा करण्यास टाळाटाळ सुरु आहे. तेंव्हा तातडीने पुन्हा जोडणी करुन द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याचबराब्sार सरकारने श्रीमंतांचीच कर्जे माफ केली आहेत, असा आरोप करत सर्वांची कर्जमाफी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कृषीपत्तीन सोसायटीमधील कर्जमाफी केली गेली आहे. पण बहुसंख्य शेतकऱयांनी बँका व खासगी सोसायटय़ांकडून कर्जे काढली आहेत. ती कर्जमाफी होणे गरजेचे आहे. तातडीने संपूर्ण कर्जमाफी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा शेतकऱयांनी यावेळी दिला आहे.

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आप्पासाहेब देसाई, रामनगौडा पाटील, गजु राजाई, राजू कागणीकर, नामदेव धुडूम, गजानन पावले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related posts: