|Monday, September 16, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत अ संघाचा सलग दुसरा विजय

भारत अ संघाचा सलग दुसरा विजय 

 इंग्लंड लायन्सवर 102 धावांनी मात, मयंक अगरवालचे मालिकेतील दुसरे शतक

वृत्तसंस्था/ लिसेस्टशर

सलामीवीर मयंक अगरवालच्या आक्रमक शतकी खेळीच्या जोरावर भारत अ संघाने तिरंगी मालिकेत आणखी एका विजयाची नोंद केली. इंग्लंड लायन्सवर 102 धावांनी विजय मिळवत भारताने या मालिकेतला सलग दुसरा विजय मिळवला. प्रारंभी, भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 309 धावा केल्या. प्रत्युतरातदाखल खेळताना इंग्लंड लायन्स संघाचा डाव 41.3 षटकांत 207 धावांत संपुष्टात आला. मुंबईकर शार्दुल ठाकुरने 53 धावांत 3 गडी बाद केले.

प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना मयंक अगरवाल व शुभमान गिल यांनी 165 धावांची सलामी दिली. मयंक अगरवालने मालिकेतील दुसरे शतक झळकावताना 104 चेंडूत 10 चौकार व 4 षटकारासह 112 धावांची वादळी खेळी साकारली. गिलने देखील शानदार खेळी साकारताना 80 चेंडूत 72 धावांचे योगदान दिले. गिल बाद झाल्यानंतर अगरवालने मालिकेतील दुसरे शतक साजरे केले. शतकी खेळीनंतर तो लगेच बाद झाला. यानंतर, हनुमा विहारीने 63 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारासह 69 धावांची खेळी साकारत संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. दीपक हुडाने 27 चेंडूत 33 धावा करत त्याला चांगली साथ दिली. विहारी-हुडाच्या या खेळीने भारताला 50 षटकांत 6 बाद 309 धावापर्यंत मजल मारता आली.

प्रत्युतरातदाखल खेळताना भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱयासमोर इंग्लंड लायन्स संघाचा डाव 41.3 षटकांत 207 धावांवर संपुष्टात आला. लायन्सतर्फे डॉसनने सर्वाधिक 38 धावा केल्या. कर्णधार मुलाने (23), बर्नाड (31) हे फलंदाज वगळता इतरांनी निराशा केल्याने लायन्स संघाला तब्बल 102 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून शार्दुल ठाकरुने 53 धावांत 3 गडी बाद पेले.

संक्षिप्त धावफलक : भारत अ 50 षटकांत 6 बाद 309 (मयंक अगरवाल 112, शुभमान गिल 69, हनुमा विहारी 72, दीपक हुडा 33, फिशर 2/58, बर्नाड 2/51).

इंग्लंड लायन्स 41.1 षटकांत सर्वबाद 207 (बेन फोक्स 32, डॉसन 38, बर्नाड 31, गुबिन्स 22, शार्दुल ठाकुर 3/53, खलील अहमद 2/30, दीपक हुडा 1/10).