|Thursday, February 20, 2020
You are here: Home » विविधा » पुण्यात आज, उद्या पाचवे रेडिओ संमेलन

पुण्यात आज, उद्या पाचवे रेडिओ संमेलन 

 पुणे /  प्रतिनिधी :

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी सामुदायिक रेडिओच्या वतीने उद्या (शुक्रवार) आणि 30 जून रोजी पाचवे राज्यस्तरीय सामुदायिक रेडिओ संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

 विद्यापीठामध्ये सकाळी 10.30 वाजता माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे अध्यक्ष अजय अंबेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. डॉ. एन.एस. उमराणी, आनंद देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 उद्घाटनाच्या सत्रानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख हे ‘सामुदायिक रेडिओ आणि साहित्य प्रसार’ या विषयावर बोलणार आहेत. यानंतर अजय अंबेकर हे ‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालय’ यावर बोलणार आहेत. यानंतरच्या सत्रात मोनिका सिंग-ठाकूर ‘केंद्रीय निवडणूक आयोग’ या विषयावर बोलणार आहेत. यानंतर दूरदर्शनच्या ज्योती अंबेकर ‘आावाजाच्या वापराचे तंत्र’ यावर बोलतील. पाचव्या सत्रात महिला व बाल कल्याण विकास विभागाचे उपायुक्त रवी पाटील ‘महिला व बालकल्याण’ या विषयावर विचार मांडतील. सहाव्या सत्रात मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ याविषयावर, तर सातव्या सत्रामध्ये डॉ. माधवी रेड्डी ‘सामुदायिक रेडिओ आणि संशोधन’ या विषयावर बोलतील.

 संमेलनाच्या दुसऱया दिवशी सकाळी 9.30 वाजता अर्चना कपूर या ‘रेडिओ मेवात व स्मार्ट’, डॉ. अनिरुद्ध देशपांडे हे ‘आरोग्य विभाग’ व डॉ. राम गुडगिला हे ‘सामुदायिक रेडिओ सहभागित्वाची गरज’ यावर बोलतील. यानंतर समारोपाच्या सत्रात अभिजीत घोरपडे हे ‘माध्यम समन्वय’ याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

Related posts: