|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांचा राजीनामा

महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांचा राजीनामा 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांनी बुधवारी  सभापती पदाचा राजीनामा दिला. सत्ता स्थापनेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना व आवाडे गटात निश्चित झालेल्या फॉर्म्युल्यानुसार ‘स्वाभिमानी’च्या शिंदे यांनी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याकडे राजीमाना सुपूर्द केला. त्यामुळे आवाडे गटाच्या सदस्या वंदना मगदूम यांना महिला बालकल्याण सभापती पदाची संधी मिळणार आहे. दरम्यान या बदलानंतर अध्यक्ष पदासह उर्वरीत विषय समिती सभापती पदांच्या बदलाबाबत सकारात्मक हालचाली सुरु होण्याची शक्यता आहे. त्यासाठी येत्या आठवडय़ाभरात सत्तेतील सर्व घटक पक्षाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.

जि.प.च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार विषय समिती पदांच्या बदलाबाबत गेली दोन महिने चर्चा सुरु आहे. पण सव्वा वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार पदाधिकारी बदल करण्याबाबत गटनेत्यांमध्ये एकमत होत नसल्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली. दरम्यान भाजपकडे असणाऱया अध्यक्ष पदामध्ये कोणताही बदल केला जाणार नसून इतर पदाधिकारी बदल करण्यासाठी भाजपचा पूर्णपणे पाठींबा राहिल असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे अध्यक्ष पदामध्ये बदल होत नसेल तर इतर पदाधिकारी बदल कशासाठी ? असा सवाल उपस्थित करत सत्तेतील घटक पक्षाच्या नेत्यांकडूनही चालढकल सुरु होती. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेला शब्द पाळत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिंदे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे जिल्हा परिषदेत बदलाचे वारे सुरु झाले आहे. यावेळी शिक्षण सभापती अंबरीष घाटगे, राहूल आवाडे,, स्वाभिमानीचे सागर चिपरगे, राम शिंदे, स्वस्तिक पाटील, राजेश पाटील, प्रविण यादव, गोगा बाणदार, राजू मगदूम आदी उपस्थित होते.

Related posts: