|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » शेअर बाजारातील घसरणीचे सत्र चालूच

शेअर बाजारातील घसरणीचे सत्र चालूच 

वृत्तसंस्था /मुंबई :
गुरुवारी बाजारात पुन्हा मोठी घसरण पहावयास मिळाली. सेन्सेक्स 250 अंकावरुन जादा घरसण झाली. तर निफ्टीत 0.75 टक्केची घसरण होत बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात निफ्टीत 10,557.7 उतरला तेव्हा सेन्सेक्स 34,937.15 आडकून राहीला शेवटी निफ्टी 10,590 जवळ पोहचत बंद झाला. आणि सेन्सेक्स 35,000 थोडावर जात बंद झाला. 

मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. बीएसईचा मिडकॅपचा निर्देशाक 1.6 टक्क्यांवर बंद होत 15,176 वर बंद झाला आहे. तर निफ्टीचा मिडकॅप 100 अंकाच्या जवळ जात 2 टक्क्यांची घसरणीसह 17,845 वर बंद झाला तर बीएसईचा स्मॉलकॅपचा निर्देशाक 1.5 टक्क्या घसरण होत 15,730 वर बंद झाला.

पीएसयु बँक ,रियल्टी, ऑटो,एफएमसीजी , आयटी, औषध निर्मीती ऑईल आणि गॅस यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याचे दिसून आले. तर बँकांच्या निफ्टीत 0.4 टक्के घसरणीसह 26,325 वर बंद झाला आहे.

दिग्गज शेअर्समध्ये टेक महेद्रा, एचपीसीएल, बीपीसीइल्। टायटन , इंडियाबुल्स आयसीआयसीअय बँक, टाटा मोटस। कोल इंडिया यांच्यात 7 ते 1.8 टक्क्यापर्यत घसरण झाली. तर दिग्गज शअर्समध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा,एनटीपीसी इन्फोसिस , हिडाल्को, कोटक महिंद्रा बँक , भारती एअरटेलमध्ये 1.7 ते 1 टक्क्यांर वधारत बंद झाला.

मिडकॅप शेअरमध्ये एमआपीएल श्रीराम ट्रान्सपोर्ट आणि अदानी इंटरप्राईजेसमध्ये 5.8 ते 4.7 वर अंक आडकत बंद झाला आहे. स्मॉलकॅप शेअर्समध्ये फेडर्स इलेक्टीक, ऑलसक, एलईईटी केआरबीएल च्या अंकात 10ते 8.3 टक्यांची तुट पहावयास मिळाली. तर आयएफबी इंडस्ट्रीज इंट्रासॉफ्ट टेक आणि कॅमलिन शेअर्समध्ये 20 ते 8.7 टक्यांनी उसळी घेत बाजार बंद झाला.