|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माण तालुक्यात पेरणीसाठी बळीराजा सज

माण तालुक्यात पेरणीसाठी बळीराजा सज 

वार्ताहर / म्हसवड :

तालुक्यात झालेल्या तुरळक पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप  पेरणीसाठी शेतीची मशागत सुरू आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होऊन खरीप पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. मात्र पावसाने उघडीप दिल्यास शेतकयांवर  दुबार पेरणीचे संकट निर्माण होणार आहे. 

 मागील आठवडय़ात झालेल्या तुरळक पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील मुख्य पिक असणाया बाजरी पिकाच्या पेरणीस शेतकयांनी सुरूवात केली आहे. तर भुईमूग, वाटाणा, मूग या पिकासाठी जमिनीची मशागत सुरू असून कांदा रोप टाकण्याचे काम सुरू आहे. 

  एप्रिल ते मे महिन्यात नांगरणी केली जाते. जमिनी उन्हाळ्यात चांगल्या गरम झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली की त्या जमिनीची मशागत करण्यात येते. या जमिनीत कांदा रोपांची लागवड केली जाते. मागील आठवडय़ात झालेल्या पावसामुळे थोडय़ा फार प्रमाणात पेरणीयोग्य वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी शेतकरी मशागत व पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. बागायती क्षेत्रात जमिनी मध्ये शेतकयांकडून पेरणी उरकण्याचे काम चालू आहे. 

        खरीप पेरणीची लगबग चालू असताना शेतकरी बी – बियाणे खरेदीसाठी दुकानामध्ये गर्दी करताना दिसत आहेत. पावसा आगोदर  बी -बियाणे रासायनिक खते यांचा साठा शेतकयांकडून केला जात आहे. त्यामुळे शेतकरी सध्या शेतीच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. 

Related posts: