|Saturday, February 22, 2020
You are here: Home » क्रिडा » ओडिशाच्या दुती चंदचा नवा राष्ट्रीय विक्रम

ओडिशाच्या दुती चंदचा नवा राष्ट्रीय विक्रम 

वृत्तसंस्था /गौहत्ती

येथे शुक्रवारी झालेल्या 58 व्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठांच्या ऍथलेटीक्स स्पर्धेत ओडिशाची 22 वर्षीय महिला धावपटू दुती चंदने 100 मिटर धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवित सुवर्णपदक पटकाविले.

महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत दुती चंदने 11.29 सेकंदाचा अवधी घेत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविताना तिने यापूर्वी स्वतःच नोंदविलेला या क्रीडा प्रकारातील 11.30 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडित काढला. सदर स्पर्धा येथील इंदिरा गांधी ऍथलेटीक्स स्टेडियमवर घेतली गेली. दुती चंदने आगामी आशियी क्रीडा स्पर्धेसाठीची पात्रतेची मर्यादा ओलांडली आहे. या स्पर्धेसाठी 11.67 सेकंद ही पात्रतेची मर्यादा होती. दुती चंद आता जकार्ता येथे होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करेल. या स्पर्धेसाठी ती महिलांच्या 100 आणि 200 मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी पात्र ठरली आहे. महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या चार महिला धावपटूंनी पदके मिळविली आहेत. 1951 साली रोशन मिस्त्रीने रौप्य, 1954 साली ख्रिस्टेनी ब्राऊनने कास्य, 1982 साली पी. टी. उषाने रौप्यपदक तसेच तिने 1986 साली रौप्यपदक घेतले होते. 1998 साली रचिता मिस्त्रीने या क्रीडा प्रकारात कास्यपदक मिळविले होते.

Related posts: