|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News » गँगरेपने मध्य प्रदेश हादरले , आरोपींना कब्रस्तान न देण्याची मुस्लिम समजाची घोषणा

गँगरेपने मध्य प्रदेश हादरले , आरोपींना कब्रस्तान न देण्याची मुस्लिम समजाची घोषणा 

ऑनलाईन टीम / मंदसौर :

पुन्हा एकदा देश गँगरेपने हादरला आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये सात वर्षीय मुलीवर गँगरेप झाला. नराधमांनी हे कृत्य करत चिमुकलीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. सध्या या चिमुकलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.या बलात्कारानंतर मध्य प्रदेशातील जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे.

मंदसौरमध्ये 26 जून रोजी पीडित चिमुकलीची शाळा सुटल्यानंतर अपहरण केले होते. या मुलीला चॉकलेट-कॅण्डीचे आमीष दाखवून तिला अज्ञातस्थळी घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिच्या गळय़ावर वार करून अर्धमेलं करून झाडीत फेकून दिले. पीडित चिमुकली तिसरीत शिकते.तीचे अपहरण झाल्याची तक्रार केल्यानंतर पीडीतेची शोधाशोध घेण्यात आली.त्यावेळी ती शहरातील बस स्टॅण्डजवळ एका झाडीत जखमी अवस्थेत आढळली. तिला तातडीने इंदोरमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या तीच्यावर उपचार सुरू आहेत.