|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » उत्तर भारतात अतिवृष्टीचा कहर

उत्तर भारतात अतिवृष्टीचा कहर 

नवी दिल्ली, श्रीनगर / वृत्तसंस्था

मान्सूनने देश व्यापल्यापासून उत्तरेकडील राज्यांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने उत्तर भारतात थैमान घातले असून जम्मू काश्मीर, उत्तराखंडच्या काही भागात पूरस्थितीही निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थानमध्येही दमदार पाऊस सुरू आहे. राजस्थानात अतिवृष्टीमुळे माय-लेकींचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर, जम्मू काश्मीरमध्ये पावसासंबंधीच्या घटनांमध्ये एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस उत्तर भारतात आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशातील चंबामधील रावी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे शेतीचे नुकसान झाले असून नदीकाठच्या काही गावांचा संपर्कही तुटला आहे. हिमाचलमधील रावी नदीप्रमाणेच काश्मीरमधील झेलम नदीलाही पूर आला आहे. पूरसदृश स्थितीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील अलकनंदा नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी बचाव व मदत पथकाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. राजस्थानमधील बिकानेर परिसरातही दरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे आणि काही घरांमध्ये पाणी घुसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा जोर वाढण्याचीही शक्मयता जम्मू काश्मीरच्या सिंचन आणि पूर व्यवस्थापन विभागाने वर्तवली आहे. श्रीनगरमध्ये सकाळी 8.30 पर्यंत 12.6 मिमि पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. अनंतनाग येथे झेलम नदीने धोक्मयाची पातळी ओलांडली असल्याचीही माहिती समोर आली आहे. बालटाल आणि पहलगाम या दोन्ही भागांमध्ये पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. दक्षिण काश्मीरमध्ये दोन दिवसांपासून पाऊस थोडा वेळ विश्रांती घेऊन पडतो आहे. मात्र पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या भागातही सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अमरनाथ यात्रा प्रवासाला ‘ब्रेक’

जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा जोर वाढल्याने अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पहलगाम येथे अनेक भागांमध्ये भूस्खलन झाले आहे. त्यामुळे ही यात्रा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पूरस्थिती आणि पावसाचा धोका टळत नाही तोपर्यंत अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या तिसऱया तुकडीला भूस्खलन झाल्यामुळे थांबवण्यात आले आहे. अमरनाथ येथे जाणाऱया यात्रेकरूंसाठी पहलगाम आणि बालटाल येथे 40 हजारपेक्षा जास्त सशस्त्र सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तसेच यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोन यांचाही वापर केला जात आहे.

Related posts: