|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 22 हून अधिक जणांचा मृत्यू

बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 22 हून अधिक जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तराखंडच्या नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावर एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 22 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी खचाखच भरलेली बस भौनहून रामनगरला जात होती. नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावरच्या ग्वीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस दरीत जाऊन कोसळली.

या भीषण अपघातात 22 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. बस 28 आसनी असून, रस्तावरून खाली उतरत जवळपास 60 मीटर खाली कोसळली. जिल्हा आपत्कालीन विभागानं या दुर्घटनेत 22 लोकांचा मृत्यू झाल्याची खात्रीलायक माहिती दिली आहे. बस दरीत कोसळल्यानंतर एका झाडाला लटकली. त्यामुळे मोठा अपघात होता होता टळला. ही घटना काल संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यानची आहे