|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘सूर नवा ध्यास नवा’चे लिटल चॅम्प्स पर्व

‘सूर नवा ध्यास नवा’चे लिटल चॅम्प्स पर्व 

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा कार्यक्रमामधील गायकांनी गायलेली विविध शैलींमधील गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. एक आश्चर्याचा सुखद धक्का या गायकांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक भागामध्ये पॅप्टनसना तसेच प्रेक्षकांना दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. म्हणूनच सूर नवा ध्यास नावाच्या पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर आता कलर्स मराठी घेऊन येत आहे ‘सूर नवा ध्यास नवा लिटल चॅम्प्स’ या पर्वामध्ये देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. परंतु, मंचावर असणार आहेत लहान मुले. 6 ते 15 वयोगटातील बच्चे कंपनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. महाराष्ट्राच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास सुरू होणार आहे 6 जुलैपासून. या पर्वाचे परीक्षक असणार आहेत आपल्या सगळय़ांचा लाडका अवधूतदादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदस्त्यात आहे.

6 जुलै : रत्नागिरी-गोगटे जोगळेकर कॉलेज, ऍड. एन. वी. जोशी मार्ग, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोर्टजवळ, रत्नागिरी-415612, 7 जुलै : कोल्हापूर-देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर-416012, 8 जुलै : पुणे-डी. इ. एस. सेकंडरी स्कूल, 486 सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल पॅम्पस, टिळक रोड, पुणे-30, 11 जुलै : नागपूर-सुयोग मंगल कार्यालय, 51, लक्ष्मी नगर, नागपूर-440010, 14 जुलै : मुंबई-आय. इ. एस. मॉडर्न हायस्कूल (ऍशलेन), डी एस बाब्रेकर मार्ग, साने गुरुजी शाळेमागे, दादर (प), मुंबई-400028, 15 जुलै : ठाणे-ब्राम्हण महाविद्यालय, घंटाळी देवी मंदिर रोड, तीन पेट्रोल पंपजवळ, नौपाडा, ठाणे (प)- 400602, 17 जुलै : औरंगाबाद-शिवछत्रपती महाविद्यालय, सिडको, एन 3, औरंगाबाद-431003, 18 जुलै : नाशिक-रुद्र इंटरनॅशनल स्कूल, अंबड त्रिमूर्ती लिंक रोड, उपेन्द्र नगर, नाशिकö10 येथे ऑडिशन्स होणार आहेत.