|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अग्नि-5 लवकरच शस्त्रसंभारात

अग्नि-5 लवकरच शस्त्रसंभारात 

क्षेपणास्त्राच्या मारक पल्ल्यात पूर्ण चीन : अण्वस्त्रs वाहून नेण्याची क्षमता, भारताचा दबदबा वाढणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या शस्त्रसंभारात सर्वाधिक शक्तिशाली शस्त्र सामील होणार आहे. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली ‘अग्नि-5’ची पहिली खेप लवकरच भारतीय सैन्यदलांना सोपविली जाणार असल्याने सैन्याचे सामर्थ्य आणखीनच वाढेल. ‘अग्नि-5’च्या मारक पल्ल्यात पूर्ण चीन समाविष्ट होत असल्याने हे क्षेपणास्त्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

5000 किलोमीटर इतकी मारक क्षमता असणारी ही क्षेपणास्त्र प्रणाली अण्वस्त्रs वाहून नेऊ शकते. या क्षेपणास्त्र प्रणालीला स्टॅटजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) मध्ये सामील करण्याची तयारी आहे. देशाचे सर्वात अत्याधुनिक शस्त्र एसएफसीला सोपविण्यापूर्वी अनेक चाचण्या घेतल्या जात आहेत.

या क्षेपणास्त्राद्वारे बीजिंग, शांघाय, गुआंगझाऊ आणि हाँगकाँगसारख्या शहरांसमवेत चीनच्या कोणत्याही भागाला लक्ष्य केले जाऊ शकते. मागील महिन्यात देखील अग्नि-5ची ओडिशाच्या किनाऱयावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. एसएफसीत सामील करण्याअगोदर अनेक अन्य चाचण्या आगामी काळात होणार आहेत.

शत्रूला धाकात ठेवणार

अग्नि-5 क्षेपणास्त्र ही एक सामरिक संपत्ती असून शत्रूला धाक बसविण्याचे काम करेल. आम्ही या सामरिक प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात आहोत. स्वतःच्या श्रेणीतील हे अत्याधुनिक शस्त्र आहे, ज्यात दिशादर्शनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असून अण्वस्त्र वाहून नेण्याची याची क्षमता अन्य क्षेपणास्त्र प्रणालींपेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचे अग्नि-5 कार्यक्रमाशी संबंधित अधिकाऱयाने
म्हटले. अग्नि-5 ची पहिली खेप लवकरच एसएफसीला सोपविली जाणार आहे. परंतु या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती देण्यास संबंधित अधिकाऱयाने नकार दिला. शेजारी देशांकडून सुरक्षा विषयक आव्हाने वाढली असताना भारताच्या शस्त्रसंभारात या क्षेपणास्त्राचा समावेश होतोय.

 

Related posts: