|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » चोर समजून बीडमध्ये दोघांना मारहाण, पोलिसांकडून सुटका

चोर समजून बीडमध्ये दोघांना मारहाण, पोलिसांकडून सुटका 

ऑनलाईन टीम / बीड :

धुळे आणि मालेगावमध्ये जमावाने वाटसुरूंना बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्येही असाच प्रकार घडला.बीडपासून जवळ असलेल्या पेंडगाव परिसरात ट्रकला दबा देऊन बसलेल्या दोघांना जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

मारहाण केलेल्या व्यक्तींना लोकांनी लपत असताना पाहिले व चौकशीत त्यांना स्वतःबद्दल माहिती देत आली नाही. त्यामुळे लोकांनी त्यांना चोर समजून मारहाण केली.त्यांना ताब्यात ठेवूनच लोकांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी या दोघांची सुटका केली.

 

Related posts: