|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मणेरी येथील अपघातात दुचाकीस्वार गंभीर

मणेरी येथील अपघातात दुचाकीस्वार गंभीर 

वार्ताहर / दोडामार्ग:

दोडामार्ग-बांदा महामार्गावर मणेरी येथे ग्रामीण रुग्णालयानजिक दोन दुचाकीत समोरासमोर अपघात होऊन मणेरी येथील प्रभाकर सीताराम नाईक (65, मणेरी) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांना येथील दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचार करून बांबोळी-गोवा येथे पाठविण्यात आले. अपघातात नाईक यांच्या गाडीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

मणेरी येथून दोडामार्गच्या दिशेने येणाऱया प्रभाकर नाईक हे दोडामार्ग रुग्णालयानजिक आले असता समोरुन येणाऱया दुसऱया दुचाकीस्वराने नाईक यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत नाईक यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला तर नाईक हे धक्क्याबरोबर बाजूला फेकले गेले. यावेळी त्यांच्या दोघांच्या समोरच्या बाजूला गंभीर दुखापत झाल्या. यावेळी त्यांना येथील दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तात्काळ उपचार करून बांबोळी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.