|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम यांची दत्त मंदिरास भेट

राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम यांची दत्त मंदिरास भेट 

प्रतिनिधी/ कुरूंदवाड

शिरोळ तालुक्यातील जनतेला प्रदुषणा पासून मुक्त करण्यासाठी आधुनिक उपाय योजनांचा वापर करून तालुका प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम यांनी नृसिंहवाडी येथे दिली.

ते श्री दत्त चरणांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आले असता पत्रकरांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. आज सकाळी दहा च्या सुमारास त्यांचे नृसिंहवाडी येथे आगमन झाले. हलगी व फटाक्यांच्या गजरात शिवसेना नृसिंहवाडीच्यावतीने स्वागत करणेत आले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार उल्हास पाटील, तालुका अध्यक्ष सतीश मलमे, नियोजन मंडळ सदस्य मधुकर पाटील आदी मान्यवर होते.

येथील दत्त देव संस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नामदार कदम यांनी पंचगंगा व कृष्णा या नद्यांच्या प्रदूषण मुक्तीबाबत आधुनिक साधनांचा वापर करणार असून सदर प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी इंग्लंड मधून खास पथक पाचारण करणेत आले आहे. तालुक्यातील रोगराईचा प्रश्न गंभीर असून त्याबाबत योग्य उपाययोजना व नियोजन झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शिरोळ तालुक्यातील व मुख्य शहरातील सांडपाणी समस्या लवकर सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून यासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट केले.

शिरोळ नगरपालिकेबाबत राजकीय भाष्य करण्यास नकार देत प्रदुषण हा एकच मुद्दा सोडविण्यासाठी मी तालुक्यात आलो आहे, असे सांगून राजकीय चर्चेला विराम दिला.

तर दत्त मंदिरासमोर वाळू उपसा बंदी केली जाईल

पंचगंगा सोबत बेकायदेशीर होणाऱया वाळू उपशामुळे कृष्णा नदी प्रदूषित होऊन घाट  संरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला असता याबाबत मला गांभीर्य असून बेकायदा वाळू उपशाबाबत लेखी अर्जानुसार निशित बेकायदा वाळू उपसा बंदी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

  यावेळी माजी अध्यक्ष शशीकांत बड्ड पुजारी, संजय उर्फ सोनू पुजारी, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, कमरूद्दीन पटेल, प्रदीप धनवडे, मिलिंद पुजारी, अभिजित जगदाळे, प्रदीप खोचरे, गणेश सुतार, आण्णासाहेब बिलोरे, सौ मंगळ  चव्हाण व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: