|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » संस्थात्मक गुंतवणूकदारांमुळे तेजी परत

संस्थात्मक गुंतवणूकदारांमुळे तेजी परत 

बीएसईचा सेन्सेक्स 144, एनएसईचा निफ्टी 42 अंकाने मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

रुपयामध्ये तेजी परतल्याने संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून खरेदी करण्यात आली. यामुळे बाजार वधारत बंद झाला. सेन्सेक्सची सुरुवात घसरणीने झाली होती. मात्र बाजारात खरेदी परतल्याने 114 अंकाने मजबूत झाला. निफ्टी 10,700 च्या आसपास स्थिरावला.

बीएसईचा सेन्सेक्स 114 अंकाने मजबूत होत 35,378 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 42 अंकाच्या तेजीने 10,699 वर स्थिरावला.

अमेरिका आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील व्यापारी संबंध ताणल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील संमिश्र परिणाम अजूनही आहेत. औषध आणि आयटी कंपन्यांमध्ये खरेदी दिसून आली.

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून सकारात्मक संकेत मिळाल्याने देशातील बाजारात स्थिरता दिसून आली. एक्स्चेंज दर आणि आऊटलूक चांगला असल्याने औषध आणि आयटी कंपन्यांनी चांगली कामगिरी केली. येत्या कालावधी आंतरराष्ट्रीय पातळीवरून मिळणाऱया संकेतानुसार बाजारात गुंतवणूक होत राहील, असे गिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले.

बीएसई सेन्सेक्समध्ये सन फार्मा, मारुती सुझुकी, इन्फोसिस, ओएनजीसी, रिलायन्स इन्डस्ट्रीज, टीसीएस, हीरो मोटो, कोटक बँक, टाटा स्टील, एनटीपीसी 1.72-0.99 टक्क्यांनी वधारले. लंडन स्टॉक एक्स्चेंजमधून वेदान्ता रिर्सोसेजला बाहेर काढण्याचा निर्णय प्रवर्तक अनिल अगरवाल यांनी घेतल्याने सेन्सेक्समध्ये वेदान्ताचा समभाग 3.25 टक्क्यांनी घसरला. याव्यतिरिक्त आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एसबीआय, पॉवरग्रिड, एल ऍण्ड टी, हिंदुस्थान युनि, एशियन पेन्ट्स 1.62-0.23 टक्क्यांनी घसरले.

बीएसईमधील निर्देशांकांची कामगिरी पाहता आरोग्यसेवा 1.80 टक्के, आयटी 1.07 टक्के, वाहन 1 टक्का, टेक 0.95 टक्के, तेल आणि वायू 0.78 टक्क्यांनी वधारले. बीएसईचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक वधारले.

Related posts: