|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » इस्रोच्या वेधशाळेने कैद केले अनोखे छायाचित्र

इस्रोच्या वेधशाळेने कैद केले अनोखे छायाचित्र 

80 कोटी प्रकाशवर्षांच्या अंतरावरील आकाशगंगेचे काढले छायाचित्र

वृत्तसंस्था/ चेन्नई

भारताची पहिली अंतराळ वेधशाळा ‘ऍस्ट्रोसॅट’ने पृथ्वीपासून 80 कोटी प्रकाशवर्षांच्या अंतरावील एका आकाशगंगेचे छायाचित्र मिळविले आहे. ‘एबेल 2256’ नावाची ही आकाशगंगा तीन आकाशगंगांना मिळून तयार होत आहे. या तिन्ही आकाशगंगांमध्ये देखील 500 हून अधिक आकाशगंगा आहेत. या सर्वांचा एकूण आकार पृथ्वीच्या ‘मिल्की’ आकाशगंगेपेक्षा 100 पट तर वजन 1500 पटीने अधिक आहे.

इस्रोने ‘एबेल 2256’ची माहिती आणि याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. खगोलशास्त्रज्ञांनुसार पृथ्वीच्या आकाशगंगेचा आकार नागमोडी आहे. अशा आकाशगंगांचा रंग निळा असतो आणि यात निरंतर स्वरुपात ताऱयांची निर्मिती होत असते.

तर ‘एबेल 2256’ सारख्या आकाशगंगा अंडाकृती असतात, लाल रंगाने ओळखल्या जाणाऱया या आकाशगंगांमध्ये जुने तारे असतात. इस्रोला मिळालेल्या या माहितीमुळे आकाशगंगांमध्ये होत असलेले बदल अभ्यासण्यास मदत मिळू शकते. हा ‘ऍस्ट्रोसॅट फोटो ऑफ द मंथ’ असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. खगोलशास्त्रज्ञांनी अल्टा व्हायोलट इमेजिंग टेलिस्कोपचा वापर करत हे छायाचित्र मिळविले आहे.

Related posts: