|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अल्पवयीन दुचाकीस्वारांच्या पालकांवर कारवाईचा बडगा

अल्पवयीन दुचाकीस्वारांच्या पालकांवर कारवाईचा बडगा 

शहर वाहतूक पोलिसांचा दणका

3 पालकांवर न्यायालयीन कारवाई

पोलीस निरीक्षक विभूते यांच्या निर्णयाचे स्वागत

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी शहर वाहतूक शाखेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. 18 वर्षाखालील दुचाकीस्वारांना अद्दल घडवण्यासाठी पहिले पाऊल उचलताना 3 पालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. ही प्रकरणे न्यायालयीन कारवाईसाठी पाठवण्यात आली आहेत.

अनेक पालकांकडून आपल्या अल्पवयीन मुलांना गाडय़ा दिल्या जातात. मुले ऐकत नसल्याने नाईलाजास्तव गाडी दिल्याच पालकांकडून सांगितले जाते. मात्र या वयातील मुलांना वेगाचे भान राहत नसल्याने अनेकदा अपघतांना निमंत्रण मिळते. यात अल्पवयीन चालकाबरोबरच इतरांनाही नाहक त्रास होत असल्याने अल्पवयीन दुचाकीस्वारांना शिस्त लावणे आवश्यक बनले आहे.

आवश्यक असल्यास 18 वर्षे पूर्ण झाल्यावरच परवाना काढून गाडय़ा द्या, असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी केले आहे. अल्पवयीन मुलांना गाडय़ा देणाऱया पालकांवर कारवाई करण्याचा कायदा आहे. या कायद्याच्या आधारावरच या 3 पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातून इतर पालकांनीही धडा घ्यावा, असेही विभूते यांनी सांगितले.

शहरात विशेषतः कॉलेज व क्लासेसला जाताना काही अलपवयीन दुचाकी घेवून जातात. परवाना नसताना वाहन चालवणे हा गुन्हा आहे. इतकेच नव्हे तर काही मुले डबल किंवा ट्रिपल सीटही भरधाव वेगाने जातात. आपल्या पाल्याकडे पालकांचे विशेष लक्ष असले पाहिजे, अन्यथा अपघाताची शक्यताही वाढते, असेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरी शहरातील 3 पालकांवर कडक कारवाई झाल्याने इतरही पालक धास्तावले आहेत. पोलीस निरीक्षक विभूते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमी होणारी वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी प्रयत्न केले असून आता या कार्यालयाच्या परिसरात सुटसुटीतपणा आला आहे.

गाडय़ा लावताना वाहतूक कोंडी टाळा

शहरातील नो पार्कींगमधील वाहने यापूर्वी टोइं&ग व्हॅनने उचलल्या जात होत्या. या टोईंग व्हॅनच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. मात्र विभूते यांनी नो पार्कींगमधील गाडय़ांना जॅमर लावून दंडात्मक प्रक्रिया करण्यास सुरू केली आहे. टोईंगने गाडय़ा कशा ही पध्दतीने उचलल्या जात होत्या. त्यामुळे गाडय़ांवर क्रॅशही पडत होत्या. जॅमरमुळे दुचाकीस्वारांना पळही काढता येत नाही त्यामुळ दड भरूनच गाडी ताब्यात घ्यावी लागते. वाहतुकीला अडथळा होईल, अशा पध्दतीने वाहने लावू नका, रस्त्याच्या कडेला ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही अशा पध्दतीने गाडय़ा लावा, असे आवाहन विभूते यांनी केले आहे.

Related posts: